श्रीमनुदेवी येथे कसे पोहोचाल?
बसगाड्या :
जळगांवहून बसगाडीने आडगांवला
(१ तास)
उतरावे लागते.
आडगांवहून श्रीमनुदेवी मंदिर ९ कि.
मी. आहे.
आंडगावहून श्रीमनुदेवी मंदिरापर्यंत आटोरीक्षा मिळू शकते किंवा मिळू शकत नाही.
जळगांव ते श्रीमनुदेवी मंदिर हे ३५ कि. मी. आहे.
(जळगांव बसस्थानकावरुन रोज सकाळी ९ वा.
आणि सायंकाळी ७ वा.
आडगांवला बसगाडी असते.)
यावल किंवा चोपड्याहून बसगाड्यांनी किनगांवला उतरावे लागते.
किनगांवहून आडगांवपर्यंत आटोरीक्षा ने जावे लागते.
आंडगावहून श्रीमनुदेवी मंदिरापर्यंत आटोरीक्षा मिळू शकते किंवा मिळू शकत नाही.
खाजगी वाहने :
जळगांवहून तुम्ही खाजगी वाहनाने
( आटोरीक्षा,
कार, जीप,टॅक्सी इ.
) थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात.
( अंदाजे जाऊन-येऊन
५००-६०० रूपये खर्च
येऊ शकतो. )
श्रीमनुदेवीला जाण्याच्या मार्गाच्या अधिक माहितीसाठी खालील
फोनवर संपर्क साधू शकतात.
संजय महाजन
दिशा एंटरप्राईजेस
फोन : २५७-२२२७५४४ [
सोम. ते शनि., स.
९ ते सां ६ ]
श्रीमनुदेवीच्या दर्शनाची योग्य वेळ
:
कोणतीही काळ दर्शनास चांगला पण योग्य वेळ ही आक्टोंबर ते
डिसेंबर महिन्यात कारण या दरम्यान तुम्ही निर्सग सौदर्य आणि वाहता धबधबा,
नदी पाहू शकतात.
प्रत्येक वर्षाच्या चैत्र व माघ शुद्ध अष्टमी या दिवशी
देवीवर 'नवचंडी'
महायज्ञाचे आयोजन केले जाते.
संपुर्ण मार्गशीर्ष महिना व श्रावण महिन्यातील पिठोरी
अमावस्येच्या दुसर्या दिवशी यात्रा असते.
अश्वीन महिन्यात नवरात्रोस्तव तसेच देवीची यात्रा असते.
मंदिराची वेळ :
सोमवार ते रविवार (
स. ८ ते सां ६)
जळगांव रस्ता
नकाशा
: